गोकुळचे राजकीय भवितव्य “या” जेष्ठ संचालकांच्या हाती…

कोल्हापूर : सध्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून यामध्ये गोकुळ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्था चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. दोन्ही संस्थेचे राजकीय डावपेच हे एकमेकांवर अवलंबून असल्याचे आज तागायात तरी पहायला मिळाले आहे.

गेल्या काही निवडणुकांपासून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेली आहे. राज्यातील इतर सहकारी दूध संस्थेच्या तुलनेत गोकुळची कामगिरी हि अतिशय उत्तम असल्याचे पाहायला मिळाले आहे. याचे मोठ्या प्रमाणात श्रेय हे संचालक मंडळाला जाते कारण सर्व महत्वाचे निर्णय हे त्यांचे आहेत.

सध्या एकंदर राजकीय परिस्थिती व विरोधकांनी चालवलेली भूमिका पाहता गोकुळ चे संपूर्ण राजकीय भवितव्य हे चेअरमन रवींद्र आपटे , ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील (आबाजी) , रणजीतसिंह पाटील, अरुण डोंगळे व विश्वास जाधव यांच्यावर अवलंबून असणार आहे. कारण सध्या यांचा जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थेबरोबर असलेले संबंध तसेच यांच्या बाजूने ठरावाची असलेली संख्या ही अतिशय नावाजण्या जोगी आहे. याच बरोबर या सर्वांचा कित्येक वर्ष संघाच्या कामकाजात असलेला अनुभव व यांच्या कारकीर्दीत संघाची झालेली प्रगती ही पण जमेची बाजू आहे. यातील एकही संचालक बाजूला गेल्यास अधिक प्रमाणात विरोधकांना फायदा होणार हे मात्र निश्चित त्यामुळे यांचे नेते आमदार पी एन पाटील व महादेवराव महाडिक यांना एकसंध ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील व सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे एकत्र राहतील अशीच आहे.

माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी निवडणुकी मधून घेतलेली निवृत्ती ही सुद्धा काही प्रमाणात विरोधकांना फायदा देवून जावू शकते ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. कारण जेष्ठ संचालकांच्या रांगेत नरके हे देखील आहेत. त्यामुळे ही पाच जेष्ठ मंडळी नरके यांची जागा विरोधकांच्या पासून लांब ठेवण्यात यशस्वी ठरतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–