देशातील तरुणांनी केली मोदींकडे हि मागणी…

देशामधील बेरोजगारी दिवसोंदिवस वाढतच चालला आहे. याच समस्येला कंटाळलेल्या / वैतागलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाचा आधार घेत पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली.

‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर १३ लाख ७० हजारांहून अधिक जणांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते त्याचं काय झालं? असा प्रश्न विचारला आहे. राजकीय विषयांमध्ये मोदी रोजगार दो हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेण्डींग विषय आहे.

करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लाखो लोकांनी रोजगार गमावला होता. सीएमआयईईच्या अहवालानुसार २०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावला. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेलं आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटवरुन केली जात आहे.

त्याच बरोबर आता ट्विटर वर मोदी गर्लफ्रेंड दो हा मिस्कील ट्रेण्ड हि जोरदार चालू झाला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–