सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका रद्द निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

राज्यातल्या सहकारी सोसायट्यांच्या निवडणूका रद्द करायच्या राज्यशासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका रद्द करुन सध्याच्याच व्यवस्थाप् मंडळाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

याविरोधात याचिकाकर्त्यांनी व्यवस्थापक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात न्यायमूर्ती आर डी. धनुका आणि व्ही जी. बिश्ट यांच्या खंडपीठानं यासंदर्भात संवैधानिक आणि कायदेशीर अधिकारांचा भंग झाला नसल्याचं मत व्यक्त केलं.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–