देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज – नितीन गडकरी

पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून पुढच्या १० वर्षात इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर वाढवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. कोविड-19 वर पतंजलीच्या औषधाची घोषणा काल दिल्लीत करण्यात आली.

त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी पतंजलीचे बाबा रामदेव, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशात इलेट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली.

पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या अनुषंगानं बोलताना, संपूर्ण विश्वाला दिशा देण्याची ताकद भारतीय आयुर्वेदात असल्याचं गडकरी म्हणाले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–