आजकाल प्रेमाची संकल्पना बदलत चालली आहे. तासन् तास फोनवर गप्पा, चॅटिंग, गाडीवरून फिरणे, डिनर पार्टी ला जाणे एन्जॉय करणे म्हणजे प्रेमाचा अविभाज्य घटक बनला आहे. वाढत्या वयात प्रत्येकाला प्रेम व्यक्त करण्याचा आणि जोडीदार निवडण्याचा हक्क आहे.

प्रेम हे सांगून, ठरवुन होत नाही. काहींचे एकतर्फी ही असू शकते. अशा वेळी समोरची व्यक्ती प्रेमात नकार मिळाला की किती अस्वस्थ होते, काहीवेळा तेवढाच मनात राग ठेऊन समोरच्या व्यक्ती विषयी द्वेष निर्माण करतो. नाहीतर आपण स्वतः आत्महत्या करायला उठतो. किती हा स्वैराचार म्हणायचा. एखाद्या व्यक्तीवर प्रेम झालं तर ते आपल्या जवळ जपून ठेवावं आणि योग्य वेळी व्यक्त करावं. खरं त्याचं बाजारीकरण करून नको. खरं प्रेम माणसाला स्वतः च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. ते प्रेम कोणावरही आणि कशावरही जडलेल असो. मात्र ते हृदयातून उमलायला हवं. खरं निःस्वार्थी प्रेम माणसाच्या विकासाची पहिली अवस्था आहे. तेवढा त्यात विश्वास ही हवा आणि समोर माणूस ही.

प्रेमासाठी दुसरीकडे जायची गरज नाही, कारण ते प्रत्येकात सामावलेलं आहे. फक्त त्याला व्यक्त व्हायला संधी हवी आहे. आजूबाजूच्या संकुचित विचारामुळे ते प्रकट व्हायला असमर्थ आहे.

आजकाल बरीच लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज करून स्थिर आहेत. काहींच्या मते लव्ह मॅरेज जास्त टिकत नाहीत, तर काहींच्या मते काहींचीअरेंज मॅरेज तरी कुठं स्थिर आहेत हा ही एक मोठा प्रश्न आहे? जरी हे सर्व स्वातंत्र्याचा भास करून देत असले तरी प्रत्यक्षात वास्तव मात्र भिन्न असते. आपण कोणाशी मैत्री करतो हे जसं पाहिलं जातं तसं कोणाशी सहवास टाळतो हे देखील पाहिलं जातं.

ययाति मध्ये वि. स. खांडेकर यांनी सुंदर वाक्य मांडले आहे, जग हे माणसाच्या दयेवर चालत नाही तर ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस हा केवळ प्रेमावर जगू शकत नाही तर तो इतरांचा पराभव करूनच जगतो.

स्त्री पुरुष समाज रथाची दोन चाके असून त्यांना समान संधी आणि दर्जा मिळाला की प्रगती निश्चित आहे. नाहीतर आजकाल प्रत्येक डे ला नव नवीन नाती जोडायची आणि स्वतःच्या नटण्याकडे जास्त लक्ष्य वेधून घ्यायचे. समोरच्याच कर्तृत्व पाहायचे सोडून नुसत दिखाऊ पणाला आपण भुलतो आणि भविष्य चित्र विचित्र होऊन बसतं.

संदीप हिटनीकर, कोल्हापूर
+91 90492 72748

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–