महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्याचे विधानमंडळ जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल एका बैठकीत हा निर्णय घेतला.

गौरवशाली इतिहास लाभलेली ही वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणे गरजेचे आहे, त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल, असे पटोले म्हणाले.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमातून पर्यटन तसंच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–