व्हॉट्सॲपच्या गोपनीयतेसंदर्भात एकतर्फी बदल स्वीकारार्ह नाही – केंद्र सरकारची सूचना

व्हॉट्सॲपच्या गोपनीयतेसंदर्भात एकतर्फी बदल स्वीकारला जाणार नसल्याची, स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकॉर्ट यांना पत्र पाठवून गोपनीयता धोरणातले प्रस्तावित बदल मागे घेण्यास सांगितले.

भारतात व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रस्तावित धोरणावर पुनर्विचार करावा, असे सरकारनं कॅथकॉर्ट यांना सांगितलं आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–