भारत आणि इंग्लंड कसोटी : अक्षर व हार्दिक ला संधी

भारत आणि इंग्लंड दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या चार कसोटी क्रिकेट सामन्यांपैकी दोन सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे. या सामन्यांसाठी विराट कोहली खेळणार असल्याचं मंडळानं सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ ऐवजी १८ सदस्यांची या संघासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान पहिला तर १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दुसरा सामना चेन्नई इथं तर २४ ते २८ फेब्रुवारी आणि ४ ते ८ मार्चदरम्यान अहमदाबाद इथं हे सामने खेळले जाणार आहेत.  

भारतीय संघ विराट कोहली ( कर्णधार ) , रोहित शर्मा , मयांक पुजारा , सिराज , शार्दुल ठाकूर . अगरवाल , शुभमन गिल , चेतेश्वर अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ) , केएल राहुल , हार्दिक पंड्या , रिषभ पंत ( यष्टिरक्षक ) , वृद्धिमान साहा ( यष्टिरक्षक ) , आर अश्विन , कुलदीप यादव , अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , इशांत शर्मा , जसप्रीत बुमरा , महम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

सरावासाठी गोलंदाज : अंकित राजपूत , अवेश खान , संदीप वॉरियर , कृष्णाप्पा गौतम , सौरभ कुमार .

राखीव : के . एस . भारत , अभिमन्यू ईश्वरन , शाहबाज नदीम , राहुल चहर , प्रियांक पांचाळ

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–