अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती म्हणून ज्यो बायडन यांचा आज शपथविधी

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती जो बायडन आज आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॅपिटॉल इमारतीच्या परिसरांत अभूतपुर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नॅशनल गार्डसमन गेल्या आठवड्यापासूनच कॅपिटॉलवर येण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी 25 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

त्यापैकी काही सैन्य सशस्त्र ठेवण्यास पेंटागॉनने मान्यता दिली असून कॅपिटॉलच्या सभोवताली अनेक ठाणी हँडगन्स किंवा रायफल्सच्या वापरांस मान्यता देण्यात आली आहे. पोटोमॅक नदीवरील अनेक पूल आणि शहर आणि आसपासच्या अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–