गडहिंग्लजमध्ये कोव्हीशिल्ड लसीचे वितरण उत्साहात

गडहिंग्लज, दि.१६:  गडहिग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीशील्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरण कार्यक्रम आज संपन्न झाला.

कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरून दिले आहे. उर्वरित आयुष्य जनतेचा पांग फेडण्यासाठी खर्ची घालणार आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेल्या या लसीचा २८ दिवसानी दुसरा डोस घ्यावा लागतो. हजारो जणांवर चाचणी करून या संस्थेने ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार लस निर्माण केली आहे. त्यामुळे या लसीबाबत उठणाऱ्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका.असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले आहे.

प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर म्हणाल्या, कोरोना भारतासाठी इष्टापत्ती ठरली आहे कारण या महामारीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम झाली.

यावेळी नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपाली कांबळे, प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, गटविकास अधिकारी शरद मगर, तहसीलदार दिनेश पारगे आदी प्रमुख उपस्थित होते.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–