शिवसेनेच्या नेत्याने जाहीर केले, “रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला लाखोंचे बक्षीस”

दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मागे चीन आणि पाकिस्तानाचा हात असल्याचा वादग्रस्त दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एका सभेत केला. दानवेंवर या वक्तव्यामुळे देशभरातून प्रखर टीका केली जात आहे.

यवतमाळातील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा केली आहे. या बक्षीसाची केलेली घोषणा चर्चेचा विषय ठरत आहे.

ढवळे पुढे म्हणाले, रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे 12 लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय त्याची रक्ततुलाही केली जाईल.

दरम्यान, दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण कोणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असं म्हणत ढवळे यांनी दानवेंना इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत. बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे दानवेंच्या कमरेत डावा किंवा उजवा घातला पाहिजे. शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तिला भाजपमध्ये मंत्री केलं जातं. त्यामुळे भाजपची किव येते असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा बच्चू कडू, राजू शेट्टी यांची जोरदार टीका करत कडक समाचार घेतला आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–