अनिल कपूर यांचा ‘AK vs AK’ वादाच्या भोवऱ्यात; भारतीय एअरफोर्सनं दिला ‘तो’ सीन हटवण्याचा सल्ला

▪बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच एक नवा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव AK vs AK असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं केलं आहे.

▪मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरवर भारतीय वायू सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. या ट्रेलरमधील एका दृश्यामुळे वायू सेनेचा अपमान होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

▪ या आगामी चित्रपटात अनिल कपूर वायु सेनेतील एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये ते वायु सेनेचा पोशाख परिधान करुन वादग्रस्त भाषेक संभाषण करताना दिसत आहेत. हे संभाषण वायु सेनेला आवडलेलं नाही. परिणामी त्यांनी ट्विटरद्वारे आपली नाराजी व्यक्त करत संबंधित सीन हटवण्याची सूचना केली आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–