भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना #LetterToBabasaheb व ऑनलाईन संदेशद्वारे कोल्हापूर सांगलीकरांचे अभिवादन

शिरोळ/ प्रतिनिधी :

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी लाखो लोक मुंबईच्या चैत्यभूमीवर येतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात चैत्यभूमीवर न जाता पत्राद्वारे, ऑनलाईन संदेशातुन आपल्या भावना व्यक्त करून भीम अनुयायांनी बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb ही मोहीम राबवून सर्वांनी बाबासाहेबांना घरातून पत्र पाठवून अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता #LetterToBabasaheb या मोहिमेतुन चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

अनेकांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून आपले बाबसाहेबांप्रती विचार मांडत अभिवादन केले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–