प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार संसदेच्या नव्या प्रस्तावित इमारतीची पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १० डिसेंबरला संसदेच्या नव्या प्रस्तावित इमारतीची पायाभरणी होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं की, नव्या संसद भवनाची उभारणी पुढल्या शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन केली जात आहे.

नव्या संसद इमारतीसाठी ९७१ कोटी रूपयांचा खर्च केला जाणार असून समित्यांची दालनं आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांसाठी अधिक खोल्या असतील.

बिरला यांनी सांगितलं की, हे भवन आत्मनिर्भर भारताच्या लोकशाहीचं मंदिर असेल. नवीन इमारत आकारानं जुन्या इमारतीच्या तुलनेत १७ हजार चौरस मीटर अधिक मोठी असेल, असंही त्यांनी सांगितलं.

बिरला यांनी असंही सांगितलं की, २०२२ मध्ये देश जेव्हा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल, तेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचं सत्र नवीन इमारतीत होईल.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–