तिच्यासोबत माझा वेलेन्टाईन…!

✒️ अनिकेत वाळवेकर

Advertisements

सकाळी 5.30 उठून उशीला जडलेली प्रीत बाजूला सारून मी फ्रेश झालो आणि तिच्या सोबत म्हणजे माझ्या हिरकणी सोबत थेट सायबर गाठलं..तिथून सरळ गेलो अमित दाच्या घरी मग काय आई पोहे बनवत होती..माझ्या बॅग मध्ये एक पोत आधीच घेतलं होतं आईला म्हंटलो अजून दोन दे..तिने हातातलं काम सोडून दोन पोती मला आणून दिली..आजपासून चहा बंद केल्यामुळे काहीच न पिता मी थेट माझ्या राजाच्या सहवास असणारा पन्हाळा गाठला..!
आजूबाजूला कचऱ्याचा ढीगच्या ढीग..हँडल मध्ये अडकायला पोत्यालाच थोडं दगडाने कापलं..
नरवीर बाजीप्रभू आणि वीर शिवा काशीद यांचा आशिर्वाद घेतला आणि थेट कामाला लागलो..

सांगायचा मुद्दा असा की फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा नुसतं दाढ्या वाढवून भगवा टिळा लावून महाराज होता येईल… पण महाराजांच गडच राहील नाहीत तर पुढच्या पिढीला आपण कोणत्या पराक्रमाचे धडे देणार..आज 90 % लोकांचा वेलेन्टाईन माझ्या राजाच्या पन्हाळ गडावर होतो..म्या बी त्यांच्याच पुढ्यात जाऊन एक एक प्लास्टिक आणि कचरा गोळा करत होतो..
माझा खरं प्रेम म्हणजे हे दुर्ग..आणि हे गडकिल्ले शाबूत ठेवणं हेच प्रत्येक मावळ्याच काम..
पन्हाळा प्लॅस्टिक मुक्त करण्याचा या वेलेन्टाईन निमित्त मी छोटासा प्रयत्न केलाय..आपणही पुढं या पन्हाळा जगवा आणि जागवा..कारण प्लास्टिक न त्याचा जीव गुदमरतोय..!

Advertisements