जोतिबा खेटे प्रारंभ…उद्या पहिला खेटा..

माघ महिन्यातील पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भाविक पायी चालत येतात त्यास ‘ जोतिबाचे खेटे घालणं ‘ असे म्हणतात. रविवारी जोतिबा भक्त कोल्हापूर शहरापासून तसेच जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या केर्ली , कुशीरे , निगवे , वडणगे यां गावांतून पायी चालत,
‘ जोतिबाच्या नावानं चांगभलं ‘ असा जयघोष करत जोतिबा डोंगरावर दाखल होतात .

Advertisements

जोतिबाचे खेटे याबाबत असणारी आख्यायिका..

पौराणिक काळात केदारलिंग अर्थात श्री जोतिबा दक्षिणची मोहीम आटोपून हिमालयाकडे प्रयाण करण्यास निघाले. ही वार्ता करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीस कळताच देवी स्वतः अनवाणी चालत कोल्हापूरहून डोंगरावर आली व तिने केदारनाथांना जाऊ नये, असे विनवणी केली , त्या विनवणीस केदारनाथांनी मान देऊन वाडी रत्नागिरीवर (जोतिबा डोंगर) राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून माघ महिन्यातील दर रविवारी कोल्हापूर शहर व इतर गावांतून जोतिबा डोंगर येथे पायी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे.

पायी चालत येऊन जोतिबाचे खेटे घालण्यास येणाऱ्या भाविकांमध्ये पुरुष , महिला यांच्याबरोबरच आबालवृद्धांची संख्याही लक्षणीय असते.

Advertisements