चीनमध्ये ‘करोना’चे 1500 बळी

▪चीनमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता या विषाणूची लागण झालेल्या झालेल्या चीनमधील रुग्णांची संख्या आता 65 हजारांवर पोहोचली आहे.

Advertisements

▪चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे नवे 5090 रुग्ण आढळून आल्याने या विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे..

▪काल गुरुवार अखेल चीन मध्ये करोनाचे 121 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये हुबेई , हीलोंगजिंग ,अन्हुई, हुनान आणि चॉन्गक्विंग प्रांताच्या लोकांचा समावेश आहेत.

▪स्पाईस जेटने आपली दिल्ली ते हाँगकाँग हवाई सेवा 16 ते 29 फेब्रुवारी या कालावधील स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने याआधीच त्यांची भारतातून चीनला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत.

Advertisements