केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना डॉक्टरेट पदवी


_सोशल मिडियावर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया_

Advertisements

▪केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना 13 फेब्रुवारी 2020 रोजी मानद डॉक्टरेट (डी.लीट) या पदवीने डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे गौरवण्यात आले. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १४ व्या वार्षिक पदवीदान सोहळा पार पडला. 

▪आठवले यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय समाजसेवेमुळे आणि देशसेवेमुळे डी वाय पाटील विद्यापिठाने हा गौरव करण्यात आला आहे. नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा कार्यक्रम झाला.  

▪या भव्य सोहळ्यात रामदास आठवले यांना डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लीट)  पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. डी. लिट पदवी प्रदान सोहळ्यास आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवलेसह संपूर्ण आठवले कुटुंब उपस्थित होते. 

▪दरम्यान आठवले यांना डॉक्टरेट  पदवी मिळाल्याच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडियावर वेग वेगळ्या  प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Advertisements