औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजी नगर : चंद्रकांत खैरे

▪औरंगाबादचं नाव कुठल्याही क्षणी संभाजीनगर होऊ शकतं असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादकरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही सरप्राईज देतील. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोणीही विरोध करणार नाही असंही खैरे यांनी स्पष्ट केलं.

Advertisements

▪मनसेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विचारलं असता, “ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९८८ पासून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच उल्लेख करत आहेत. शिवसेनेनेच ही मागणी कायम लावून धरली होती. राज ठाकरे हे आत्ता मागणी करत आहेत.

▪औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Advertisements