सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिर उपक्रमाचे आयोजन – उद्योजक कृष्णात उर्फ पिंटू करपे

शिरोली पुलाची – ज्या समाजात आपण वावरतो , त्या समाजाचे आपण काही देणे लागतो , ही भावना लक्षात घेऊनच शिरोली पुलाची येथील जय भवानी तालीम मंडळ आणि कृष्णात उर्फ पिंटू करपे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं.
यावेळी तब्बल ८६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले .
याप्रसंगी शिरोलीचे माजी उपसरपंच आणि उद्योजक कृष्णात उर्फ पिंटू करपे म्हणाले की , ‘ जय भवानी तालीम मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात, सामाजिक बांधिलकी हा उद्देश समोर ठेऊनच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं ,त्याला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ,यापुढेही भविष्यात युवा मंच व जय भवानी तालीम मंडळाच्या माध्यमांतून विविध उपक्रम घेणार आहोत.’
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या..
सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर ) रक्तपेढीमधील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.जय भवानी तालीम मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी नेटके नियोजन केले होते.

Advertisements
Advertisements