नेत्यांवरील गुन्ह्याची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश : राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

▪सर्वोच्च न्यायालयानं राजकीय पक्षांना गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याची कारणं आणि गुन्ह्यांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचं आदेश दिले आहेत.

Advertisements

▪गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी निवडणुका लढवण्यास बंदी आणावी ही मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र, मागण्या आणि त्यावरील चर्चा हवेतच विरल्या.

▪ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयासमोर गुरूवारी सुनावणी झाली.

▪पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांची निवडीची कारणं, महत्त्वाची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचबरोबर वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल माध्यमातूनही ही माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements