राज्यातील महाविद्यलयांमध्ये राष्ट्रगीत गाणे बंधनकारक

मुंबई: राज्यातील महाविद्यलयांमध्ये १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत गाणे बंधनकारक असेल, असा निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

Advertisements

या निर्णयानंतर राज्यातील सर्व महाविद्यालयांना दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतच निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सामंत यांनी पुढे नमूद केले.

तरुणपिढी अलीकडे तंत्रज्ञानाच्या मागे धावताना भारतीय संस्कृतीचा मूळ पाया विसरत चालली आहे. अशावेळी काही समाजकंटक तरुणांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्नामुळे भरकटणाऱ्या तरुणांमध्ये देशभावना जागृत व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात राष्ट्रगीत सादर करणे बंधनकारक केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

Advertisements