‘सक्सेस लाईफ’ ने लावला पाच कोटींचा गंडा

▪कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो  गुंतवणूकदार आणि एजंटांची आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सुमारे पाच कोटींची  फसवणूक  केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाभोळकर कॉर्नर येथील सक्सेस लाइफ आणि डेव्हलपर्स कंपनीच्या व्यवस्थापकासह सात जणांना शुक्रवारी अटक केली.

Advertisements

▪ आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीचा मुख्य सूत्रधार शामराव साळवी आणि विकास लोखंडेने डिसेंबर २०१२ रोजी ‘सक्सेस लाइफ, हेल्दी लाइफ अँड डेव्हलपर्स’ या नावाने कंपनी सुरू केली. पहिल्या टप्प्यात ५० एजंटांची नेमणूक केली. १२ टक्के व्याज आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यात एजंटांचे जाळे विणले. भरघोस परतावा मिळत असल्याने पाच वर्षांत एक हजारावर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली.

▪विठ्ठल गणपती दळवी (३९, रा. मूळगाव बोंगेवाडी, ता. पन्हाळा, सध्या रा. हुंकार कॉलनी, मणेरमळा, उचगाव) हे खासगी नोकरी करतात. त्यांची कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी ओळख झाल्यानंतर त्यांनी १९ लाख रुपये भरले. त्यांच्यासह शेकडो व्यावसायिक, नोकरदारांनी २ ते ३५ लाखांपर्यंत गुंतवणूक केली.

▪दरम्यान, गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळणे बंद झाले. मुद्दलही दिली नसल्याने फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. दळवी यांनी १९ लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. इतर गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या.

Advertisements