गृहराज्य मंत्री महोदयांना जिल्हा परिषद मधील प्रकार दिसत नाही का?

  _जिल्हा परिषद मध्ये दुसऱ्यांदा महिला अधिकारी रडल्या_

Advertisements

▪ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये सध्याचे गृहराज्यमंत्री यांनी सत्तांतर करत आपली सत्ता स्थापन केली व महाविकास आघाडीची सुरुवात करून दिली पण या जिल्हा परिषद मध्ये सध्या जे सत्ताधारी वर्गा कडून अशोभनीय प्रकार घडत आहेत त्या कडे कानाडोळा का?

▪सत्तांतर झाल्या नंतर लगेच एका कारभाऱ्यांने राजकीय इर्षेपोटी बेशिस्थ वाहन पार्किंग चालू केले व जि. प दालनात जावून चहा बिस्कीट वर ताव मारत राजकीय इर्षे च्या गोष्टी केल्या .

▪पुन्हा याच कारभारी महशयाने एका महिला अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक दिली ती ही गोष्ट जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरली.

▪आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद मध्ये शिक्षण खात्याच्या एका महिला अधिकारी यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे सध्या त्या रजेवर गेल्या असल्याची माहिती आहे.

▪ गृराज्यमंत्री यांच्या जिल्ह्यातच व विशेष म्हणजे त्यांच्याच ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद मध्ये असे प्रकार सारखे होत आहे ही लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे सत्ता असल्या गोष्टींसाठी हवी असते का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

▪स्त्रियांच्या सन्मानाबद्दल मोठ मोठ्या गोष्टी बोलायच्या त्यांच्या साठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे व दुसरी कडे महिला अधिकाऱ्यांना अशी वागणूक द्यायची हे कितपत बरोबर ? आता तरी मंत्री महोदय आपल्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नेत्यांना समज देतील का हे पाहणं महत्वाचे आहे.

Advertisements